नवी दिल्ली । फाटक्या नोटांच्या बदल्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम 2009 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत. या नियमांनुसार, लोकं नोटाच्या स्थितीनुसार आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये फाटक्या किंवा खराब नोटा बदलू शकतात. जर आपल्याकडेही फाटलेली नोट असेल तर काळजी करू नका. आपण या फाटलेल्या नोटा कोठून आणि कसे बदलू शकाल तसेच त्या बदल्यात बँक आपल्याला किती पैसे देईल याविषयी जाणून घेउयात.
येथे बदला नोटा
आता आपण आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता. परंतु ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. बँक कर्मचारी आपली नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांना स्पष्टपणे अशा नोटा बदलण्याची सूचना केली आहे. तसेच त्यांना त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेसाठीचा बोर्ड देखील लावावा लागेल.
फाटलेल्या 2000 च्या नोटसाठी आपल्याला मिळतील इतके पैसे
आरबीआयच्या नियमांनुसार, नोट किती फाटली गेली आहे हे त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटेचे 88 चौरस सेंटीमीटर (cm) प्रमाणे पूर्ण पैसे मिळतील, तर 44 चौरस सीएम अर्धेच पैसे मिळतील.
बँका कोणतीही फी घेत नाहीत
फाटलेल्या नोटांच्या देवाणघेवाणीसाठी बँका तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. ही सेवा बँकेमार्फत विनामूल्य पुरविली जाते. तथापि, अशा नोटा बदलून देण्यास बँक नकार शकते ज्याअत्यंत खराब किंवा वाईट प्रकारे जळालेल्या असतील. जर नोट हेतुपूर्वक कापली गेली असेल अशी बॅंकेला शंका असेल तरी देखील ती बदलली जाणार नाही.
रिफंड किती असेल?
50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या जुन्या फाटलेल्या नोटाच्या संपूर्ण रिफंडसाठी आपली नोट दोन भागांमध्ये विभागली जाणे आवश्यक आहे, त्यातील एक भाग संपूर्ण नोटच्या 40 टक्के किंवा त्याहून अधिक भागांना व्यापेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.