हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता नवीन वर्ष एका आठवड्याच्या अंतरावर येऊन ठेपले आहे. अशातच आता RBI ने नवीन वर्ष 2023 साठीच्या बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट जरी केली आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये बँकांना एकूण 14 बँक सुट्ट्या असतील. हे लक्षात घ्या कि, जानेवारीमध्ये चार रविवार आहेत. या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. यासोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील. इतकेच नाही तर सणांमुळे देखील वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँका काही दिवस बंद राहतील. यामुळे जर आपले जानेवारीमध्ये बँकेमध्ये काही काम असेल तर आधी सुट्ट्यांची लिस्ट तपासा. Bank Holiday
इथे हे लक्षात घ्या कि, जानेवारी 2023 मध्ये देशभरातील सर्वच बँका 14 दिवस बंद राहणार नाहीत. RBI कडून जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांपैकी अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवरील आहेत. तसेच यातील काही सुट्ट्या या स्थानिक अथवा प्रादेशिक पातळीवरील आहेत. त्यामुळे या दिवशी फक्त संबंधित राज्यांमध्येच बँका बंद राहतील. Bank Holiday
जानेवारी 2023 मधील सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)
1 जानेवारी 2023 – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
2 जानेवारी 2023 – मिझोरममध्ये नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे बँक बंद राहील.
11 जानेवारी 2023 – मिशनरी डे निमित्त मिझोराममध्ये सर्व बँका बंद राहतील.
12 जानेवारी 2023 – स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल.
14 जानेवारी 2023 – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
15 जानेवारी 2023 – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
16 जानेवारी 2023 – उझावर थिरुनाली निमित्त पॉंडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये तर कानुमा पांडुगा निमित्त आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
22 जानेवारी 2023 – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2023 – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2023 – हिमाचल प्रदेशमध्ये किंगशिप डेनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
26 जानेवारी 2023 – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
28 जानेवारी 2023 – महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असेल.
29 जानेवारी 2023 – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
31 जानेवारी 2023 – मी-दम-मी-फीच्या दिवशी आसाममध्ये बँका बंद राहणार आहेत. Bank Holiday
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Business Idea : थंडीच्या दिवसांत ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा हजारो रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, आजचे दर तपासा
Samsung Galaxy S21 FE : अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा हाय-एंड स्मार्टफोन,
ATM Transaction फेल झाले मात्र खात्यातून पैसे कापले गेले, बँकेकडून अशा प्रकारे मिळवा नुकसानभरपाई