Bank of Baroda’ घेऊ शकेल मोठा निर्णय! कर्मचार्‍यांना पर्मनन्टली करावे लागेल Work From Home

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रवृत्त करत आहेत. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, लोकंही वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशा परिस्थितीत देशाची सार्वजनिक बँक असलेली बँक ऑफ बडोदासुद्धा या दिशेने एक मोठा निर्णय घेऊ शकते. बिझिनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बँक ऑफ बडोदा ही कर्मचार्‍यांच्या एका वर्गासाठी पर्मनन्टली Work From Home पॉलिसी देण्याचा विचार करणारी देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.

मॅनेजमेंटने कन्सल्टन्सी फर्मला नियुक्त केले
BOB ने अलीकडेच विजया बँक आणि देना बँक विलीन केली आहे. कोविडनंतर ही रणनीती अंमलात आणण्याचे सुचवण्यासाठी बँकेने मॅकेन्सी अ‍ॅण्ड कंपनी (McKinsey & Co) मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मचीही नियुक्ती केली आहे. बँक ऑफ बडोदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चड्ढा म्हणाले की,”बँक अशा प्रकारे पॉलिसी लागू करण्याचा विचार करीत आहे. बँकांनी साथीच्या नंतर त्यांच्या कर्मचार्‍यांची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.”

आर्थिक निकालाची घोषणा करताना चड्ढा यांनी बँकेच्या तिसर्‍या तिमाहीच्या आर्थिक निकालाची घोषणा करताना बँकेचे हे धोरण स्पष्ट केले. बँकेने बुधवारी आपला तिसर्‍या तिमाहीचा निकाल सादर केला आहे. वित्तीय वर्ष 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत बँक ऑफ बडोदाचा 1,061.1 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, तर आर्थिक वर्ष 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत बँकेचे 1,407 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तिसर्‍या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 8.6 टक्क्यांनी वाढून ते 7,749 कोटी रुपये झाले आहे, जे मागील तिमाहीत 7,132 कोटी रुपये होते. जे कि 7,427 कोटी रुपये राहण्याचा अंदाज होता.

ऑक्टोबर महिन्यात हा निर्णय घेण्यात आला
ऑक्टोबरमध्ये बँकेने आपल्या कर्मचार्‍यांना 50-50 मध्ये विभागून वर्क फ्रॉम होम ची नवीन सिस्टिम सुरू केली. बँक ऑफ बडोदाने एकूण कर्मचार्‍यांना 50-50 भागांमध्ये विभागले होते आणि अर्ध्या कर्मचार्‍यांना पुढील पाच वर्षांसाठी वर्क फ्रॉम होम देण्याची तयारी दर्शविली होती, तर निम्म्या कर्मचार्‍यांनी बँकेत येऊन काम करण्याचे ठरवले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.