हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of India कडून गुरुवारी 5.5 टक्के वार्षिक व्याज दर असणारी 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम सुरू केली गेली आहे . बँकेकडून आता ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अतिरिक्त व्याज देण्यात येईल. बँकेने सांगितले की,” 7 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित बँकेच्या 117 व्या स्थापना दिनानिमित्त ही स्पेशल टर्म डिपॉझिट स्कीम सुरू करण्यात आली आहे. RBI च्या धोरणात्मक दरांमधील बदलांचा लाभ ग्राहकांना आणि सर्वसामान्यांना मिळावा हा यामागील उद्देश आहे.”
Bank of India च्या सर्व शाखा, इंटरनेट बँकिंग आणि BOI मोबाईल एपसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच असेल. पगारदार व्यक्ती, उद्योजक, स्वयंरोजगार, शेतकरी अशा ग्राहकांच्या मदतीसाठी केंद्रीय स्तरावर सर्व शक्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व घटकांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बँकेने म्हटले आहे.
3 वर्षांच्या डिपॉझिट्समध्ये जास्त नफा
Bank of India ने आपल्या विविध मुदतीच्या टर्म डिपॉझिट्सवरील आपल्या रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट (ROI) मध्ये 40 बेस पॉइंट्स म्हणजे 0.4 टक्के वाढ केली आहे. बँकेने म्हटले की, ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी टर्म डिपॉझिट्सवर 3 वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीसाठीच्या सध्याच्या 0.5 टक्के व्यतिरिक्त 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम दिला जाईल.
Bank of India FD व्याज दर
बँकेकडून 7 ते 14 दिवसांच्या 1 लाख रुपयांच्या FD वर 2.85 टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी, 15 ते 30 दिवस, 31 ते 45 दिवसांच्या FD वर हा दर केवळ 2.85 टक्के असेल.तर, 46 ते 60 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 3.85 टक्के व्याजदर आहे. 180 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याज दर 4.35 टक्के आहे. 1 वर्ष ते 443 दिवसांच्या FD वर वार्षिक 5.3 टक्के व्याजदर असेल. तसेच 3 वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी डिपॉझिट्सवर 5.35 टक्के दराने व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bankofindia.co.in/RupeeTermDeposit
हे पण वाचा :
EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे पैसे !!!
Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले
Bank FD : आता ‘या’ विदेशी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याज दरात केली वाढ !!!
Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!