करमाळ्यात बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळला ; २४ लोक ढिगाखाली दबले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करमाळा प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळून त्या ढिगाखाली २४ लोक दबल्याची धक्कादायक घटना अवघ्या काही वेळापूर्वी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले आहे. आत्ता पर्यंत ९ लोकांना ढिगा खालून जिवंत बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे आहे.

करमाळा गावात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हि बँक आहे. तीन मजली इमारतीत तळमजल्यावर या बँकेची शाखा आहे. सकाळी शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते आणि त्याच सुमारास हि घटना घडल्याने अधिक लोक याखाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अन्य अधिकाऱ्यानी देखील घटनास्थळी धाव घेतली. सध्या जजेसीबीच्या सहाय्याने मलबा बाजूला सारून जखमींना यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ९ जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

म्हणून केला नाही गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश

भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली : जितेंद्र आव्हाड

Leave a Comment