हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बँकांचे होम लोनवरील व्याजदर महागले आहेत. मात्र, आता दिवाळी निमित्त अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात होम लोन देत आहेत. चला तर मग कोणत्या बँकेकडून होम लोन वर किती व्याज दर दिला जात आहे ते जाणून घेउयात…
स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोन : सध्याच्या सणासुदीच्या काळात SBI कडून Home Loan वरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता बँकेकडून टॉप अप लोनवर 0.15 टक्के आणि प्रॉपर्टी लोनवर 0.30 टक्के सूट मिळेल. याबरोबरच बँकेकडून जानेवारी 2023 पर्यंत प्रोसेसिंग फीस न आकारण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. आता बँकेकडून होम लोनवर 8.40 टक्क्यांपासून व्याजदर दिला जाईल.
बजाज फायनान्स होम लोन : बजाज हाउसिंग फायनान्सकडून पगारदार लोकं आणि व्यावसायिकांसाठी दिवाळीनिमित्त खास ऑफर आणली गेली आहे. आता बँकेकडून वार्षिक 8.2 टक्के दराने Home Loan दिले जात आहे. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, ही ऑफर 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंतच फक्त काही निवडक ठिकाणांसाठी उपलब्ध असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र होम लोन : सध्याच्या सणासुदीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रने होम लोन वरील व्याजदरात 30 ते 70 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. आता बँकेकडून Home Loan वर 8 टक्क्यांपासून व्याजदर दिला जाईल.
एचडीएफसी बँक होम लोन : यंदाच्या दिवाळीला एचडीएफसी स्वस्त दरात होम लोन दिले देत आहे. हे लक्षात घ्या कि, ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त आहे त्यांना बँकेकडून 8.40 टक्के दराने Home Loan दिले जात आहे. मात्र ग्राहकांना 30 नोव्हेंबरपर्यंतच या ऑफरचा लाभ घेता येईल.
बँक ऑफ इंडिया होम लोन : बँक ऑफ इंडियानेकडून सणासुदीच्या काळात होम लोन वरील व्याजदर कमी केले गेले आहेत. आता बँकेचे होम लोनवरील व्याज दर 8.30 टक्क्यांपासून सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे, 31 डिसेंबर 2022 पर्यंत होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसेच ही ऑफर जमीन खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी, घराची दुरुस्ती करण्यासाठी किंवा नवीन घर किंवा अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/bank-of-india-home-loan.html
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या