मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुरुषांप्रमाणे यंदा महिलांचीसुद्धा आयपीएल (IPL) स्पर्धा होणार आहे. काल बीसीसीआयने महिला आयपीएलच्या तीन संघांची घोषणा केली. या मधील एका संघात नाशिकच्या प्रतिभावान माया सोनावणेची निवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून हाताच्या बोटावर मोजण्या इतपत क्रिकेटपटुंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यात नाशिकमध्ये बालपण घालवणारे बापू नाडकर्णी, सलील अंकोला यांनी मुंबईतून खेळून भारतीय संघात स्थान मिळवले मात्र मूळ नाशिककर अजूनही भारतीय संघात पोहोचलेला नाही. माया सोनावणेच्या रुपाने ते स्वप्न साकार व्हावं, अशीच इच्छा आहे. मायाला आता आयपीएलमध्ये (IPL) संधी मिळाली आहे. इथे नवलौकीक कमवून तिने भारतीय संघात स्थान मिळवावं, अशीच नाशिककरांची इच्छा आहे.
मायाची ‘व्हेलॉसिटी’ संघात निवड झाली आहे. मायाचा आयपीएलपर्यंतचा (IPL) प्रवास सोपा नव्हता. माया नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यातून आली आहे. सिन्नरमध्ये मुलींनी क्रिकेट खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. सिन्नरचे क्रिकेट प्रशिक्षक सुनील कानडी यांनी मायाला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलगी क्रिकेट खेळते म्हणून अनेक जणांनी तिची खिल्लीसुद्धा उडवली. मात्र मायाने या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मायाने आपला प्रवास सुरुच ठेवला. अखेर आज तिला तिच्या मेहनतीचे यश मिळाले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या मायाने खडतर परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे.
लेग स्पिन गोलंदाजी मायाची ताकत
बीसीसीआयने आयपीएलच्या धर्तीवर महिलांसाठी टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धा आयोजित केली आहे. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटू सुद्धा खेळणार आहे. मायाला त्यांच्यासोबत खेळण्याचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. माया एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. लेग स्पिन गोलंदाजी करण्याबरोबर ती लोअर मिडल ऑडरला आवश्यक असणारी फटकेबाजी सुद्धा करु शकते. मागच्यावर्षी NCA मध्ये 35 खेळाडूंमध्ये मायाची निवड झाली होती. तसेच मायाने पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी 20 स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना उत्तम कामगिरी केली होती.
हे पण वाचा :
तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन
उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब