Tuesday, February 7, 2023

काकडी खाण्याचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांच्या आहारात काकडीचा समावेश असतो काकडी खाल्याने आपले वजन कमी होते म्हणून अनेक लोक आपल्या डाएट मध्ये काकडीचा समावेश करतात. जास्त प्रमाणात काकडी खाल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते असे तज्ज्ञ सांगतात. रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढल्यास किडनी फेल होते.त्यामुळे जास्त प्रमाणात काकडी खाऊ नये . काकडी ही उन्हाळ्याच्या दिवसात आवडीने खाल्ली जाते कारण काकडी ही थंड असते त्यामुळे त्याचा आहारात समावेश असला तरी प्रमाणापेक्षा जास्त नसावा. एकाच वेळी पाच पेक्षा काकडी खाल्याने समस्या होऊ शकते. यामुळं किडनीचे आजार असणाऱ्यांना काकडी न खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.

काकडीमध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. काकडी ही ९६% पाण्याने बनलेली असते. काकडीतील जास्तीत जास्त पोषक तत्त्व मिळण्याकरता पिकलेली काकडी खाणं आवश्यक आहे. अनेक वेळा लोक सोलून काकडी खाताय पण पण लक्षात ठेवा काकडी सोलून खाल्ल्यास त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं. तसंच काही व्हिटॅमीन्स आणि खनिजंही कमी होतात. त्यामुळे काकडी सोलून खाल्ली जाऊ नये काकडी खाताना कोवळी काकडी खाल्ली जावी.

- Advertisement -

अनेक रिसर्चमध्ये हे आढळलं आहे की, काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करणं आणि मधुमेहातील काही कॉम्प्लिकेशन्स रोखण्यात मदत होते. पेशी योग्य पद्धतीने काम करू शकतात. रिसर्चनुसार, काकडीमुळे रक्तातील शर्कराचा स्तर प्रभावीपणे कमी करणं आणि नियंत्रित राहिल्याचं आढळलं होतं. मधुमेहाच्या रूग्णांनी काकडीचं साल नक्की खावं कारण काकडीच्या सालामध्ये जास्तकरून मधुमेहाशीनिगडीत रोग बरे करण्याचे गुण आहेत. काकडीमध्ये मधुमेहातील साखर कमी होण्यास मदत होते. याशिवाय काकडीतील ऑक्सीडंट्स तणावही कमी करतात. आपल्याला अनेक अजरांपासून दूर ठेवण्याचे काम करते .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’