हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान पहिल्यादा टीका केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल ट्विट करीत टीका केली. राणेँया ठाकरेंबद्दलच्या म्याव म्याव या वक्तव्याचे पडसात आज अधिवेशनात उमटले. राणेंच्या वक्तव्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांची घोषणा होती कि आहे तसा घडवू. ज्यावेळी राणेंनी माझ्यावर कुत्रा म्हणून टीका केली तेव्हा चंद्रकांतदादांनी रोखायला हवे होते. तेव्हा का रोखले नाही? काळ सोकावला आहे. त्यांनी तुम्हाला घडवले कि तुम्ही त्यांना घडवलेहे सांगावे ? असा सवाल जाधव यांनी केला.
भाजप नेते नितेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या म्याव म्याव या वक्तव्याचे पडसात आज विधानसभेत उमटले. यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना आमदारांनी नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी बोलताना आमदार भास्करराव जाधव म्हणाले की, जुलैमधील पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांना निलंबित करण्यात आले होते.
त्यावेळी अभिरुप अधिवेशनात तेव्हा नितेश राणे मागे मला बोलले होते की हा कुत्रा आहे. त्याला बिस्किट दिले तर चावायला जातो. त्यावेळी जेव्हा शेतकऱ्याच्या प्रश्नांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी कर्मक पावित्रा घेतला तेव्हा त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्यावरून निलंबीत करण्यात आले. आता असा न्याय या ठिकाणी लावायचा का? नितेश राणे जेव्हा मला कुत्रा म्हणाले आणि माझ्यावर टीका केली तेव्हा त्यांना का रोखले गेले नाही याचे उत्तरचंद्रकांत पाटील यांनी द्यावे, अशी मागणी यावेळी जाधव यांनी केली.