इमारतीवरुन सेल्फी काढताना तोल जाऊन 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत सेल्फी काढण्याच्या नादात बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच निष्काळजीपणामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहण्याऱ्या एका 13 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. सेल्फी काढत असताना इमारतीवरून तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथील हीना मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरुन खाली पडल्याने एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. हीना मार्केट हि दोन मजली इमारत महानगरपालिकेने अनधिकृत ठरवली आहे.

या इमारतीवरील कारवाई करताना इमारत अर्धवट तोडून ठेवली असल्याने पडीक झालेल्या या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर परिसरातील मुले खेळण्यासाठी जात असतात. यगोदरसुद्धा या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. संबंधित तरुण हा सेल्फी काढण्याच्या नादात इमारतीच्या छताच्या किनाऱ्यावर उभा होता. फोटो काढताना भान न राहिल्यामुळे तोल जाऊन तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here