लाॅकडाउनबाबात होणार मोठी घोषणा? पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता लाईव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आत वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी लोकडाऊन चा कालावधी पुन्हा काही दिवस वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या देशात एकूण ७० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून लोकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत ही माहिती दिली. आपल्या संबोधनादरम्यान आणखी नवा निर्णय घोषित करतील का, देशातील आर्थिक स्थितीला उभारी देण्यासाठी ते काही उपाय योजना सूचवतील का, किंवा काही ठिकाणी ते लॉकडाउन शिथील करतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्या संवादादरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने घोषित केलेला देशव्यापी लॉकडाउनचा तिसरा टप्पा येत्या रविवारी, १७ मे रोजी पूर्ण होत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाउनबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन आणखी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.