शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात.

पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी एका न्यूज वाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘ऑगस्टमध्ये पाठवले जाणारे पैसे हे या योजनेचा सहावा हप्ता असेल. या योजनेंतर्गत आतापर्यंत ९.५४ कोटी अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. म्हणजे या योजनेत जे काही पैसे पाठविले जातील त्याचा लाभ साडे नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळेल. आपला रेकॉर्ड चेक करा. जेणेकरून आपल्यालाही हे पैसे मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की यातील सुमारे १.३ कोटी शेतकर्‍यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा त्यांच्याकडे आधारकार्ड नाही आहे.

रेकॉर्ड बरोबर आहे की नाही हे कसे तपासावे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) आहे. तुम्हांला या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यात तुम्हाला ‘ Farmers Corner’ टॅबवर क्लिक करावे लागेल.

जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार कार्ड योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहितीही त्यात दिसून येईल.

‘ Farmers Corner’ मध्ये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन नावनोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आलेला आहे.

यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. आपल्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे. याबाबतची माहिती आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारे शेतकऱ्यांना मिळू शकते.

– ज्या शेतकऱ्यांना शासनाने या योजनेचा लाभ याआधीच दिलेला आहे, त्यांची नावे राज्य / जिल्हावार / तहसील / गाव नुसार पाहिली जाऊ शकतात.

थेट मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सुविधा
मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकर्‍यांना यामध्ये विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर दिला गेला आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.

पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261

पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109

ईमेल आयडी: [email protected]

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.