सरकारने व्हिसाबाबतचे नियम केले शिथिल, आता OCI आणि PIO कार्ड धारकांना मिळणार भारत भेटीची परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी एक निवेदन जारी केले असून, सर्व ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) आणि पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन (PIO) कार्डधारक आणि इतर सर्व परदेशी नागरिकांना भारतास भेट देण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, पर्यटन व्हिसा वगळता सर्व OCI, PIO कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या हेतूने भारतास भेट देण्यास सरकार परवानगी देत आहेत. ते अधिकृत विमानतळ आणि सीपोर्ट इमिग्रेशन चेक पोस्टद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश करू शकतात.

या व्यतिरिक्त मंत्रालयाने म्हटले आहे की, या सूटअंतर्गत सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक’, पर्यटन आणि वैद्यकीय विभाग वगळता सर्व विद्यमान व्हिसा तात्काळ प्रभावाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिकही मेडिकल अटेंडेंटसमवेत वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात.

मात्र अशा सर्व प्रवाश्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.एमएचएने असेही म्हटले आहे की, अशा व्हिसाची वैधता कालबाह्य झाली असेल तर त्यांना भारतीय मिशन / पोस्टमधून योग्य श्रेणीचे नवीन व्हिसा मिळू शकतात. करू शकता. कोविड -१९ या साथीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने फेब्रुवारी 2020 पासून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांना थांबविले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.