वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. आयसीसी च्या एका सभासदाकडून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी आपले नाव जाहीर न करण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या या स्थितीत हा चषक होण्याची फारच कमी शक्यता आहे. १५ मे ला आयसीसी च्या इव्हेंट्स समितीने अनेक पर्याय सांगितले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये नेण्याची शक्यता आहे. तर भारत २०२१ मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारत ऑस्ट्रेलिया मध्ये सामन्यासाठी जाणार आहेच तसेच इंग्लंड हि भारतात सामन्यांसाठी येणार आहे. आफ्रिका टी -२० मालिकेचा केवळ प्रश्न आहे.
T20 World Cup is likely to be postponed till 2022, no official announcement yet: ICC sources pic.twitter.com/NNkfceZsS2
— ANI (@ANI) May 27, 2020
सूत्रांच्या माहितीनुसार टी -२० विश्वचषक पुढे जाण्याची शक्यता दाट आहे. जगभरातील या परिस्थितीत पुढचे काही दिवस कोणतेच सामने होण्याची शक्यता नाही आता मात्र प्रत्यक्ष घोषणा झाल्याशिवाय काहीच नक्की होणार नाही. आयसीसी बोर्ड देखील भारतातील २०२१ मधील वर्ल्ड टी २० करमुक्त करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करणार आहे. सरकारकडून स्पष्ट चित्र मिळावे यासाठी लॉकडाऊनमुळे बीसीसीआयने अधिक वेळ मागितला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.