हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये स्फोटकांनी भरलेला अननस गर्भवती हत्तीणीला खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. यावरून देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या घटनेबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी ट्विटवरुन एक पोस्ट शेयर करुन काही गोष्टींचा खूलासा केला आहे. स्फोटकांनी भरलेला अननस शेतकऱ्यांनी हत्तीणीला जाणीवपूर्वक चारलाच नाही असं या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर हत्तीणीची हत्या होण्याआधीच तेथील नागरिकांमधील मनुष्य मेला होता असे भावनिक विधानही थरुर यांनी यावेळी केले आहे.
एका वृत्तपत्राने केलेला खुलासा शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेयर केला आहे. यामध्ये केरळमध्ये मृत्यू झालेल्या हत्तीणीला कोणाकडून जाणीवपूर्वक स्फोटकांनी भरलेला अननस देण्यात आला नव्हता, जंगली डुक्करापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी ठेवण्यात आलेला तो अननस अपघाताने त्या हत्तीणीने खाल्ला असं सांगण्यात आले आहे. तसेच केरळमध्ये अनेक भागांत जरी बेकायदेशीर असले तरी जंगली जनावरांपासून पिकांवर अतिक्रमण तसेच नुकसान टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. हत्तीनीच्या मृत्यूची घटना ही पलक्कड येथे घडली आहे, मलप्पुरम येथे नाही असं यात सागितले आहे.
The elephant dying, whether in Malappuram or Palakkad, is terrible news for all of us.
For some though, dying in a “Muslim-majority district” triggers more emotions, but that’s understandable … it’s simply that the human in them died much before the elephant did. pic.twitter.com/eisnlJhq0n— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 4, 2020
दरम्यान, हत्तीणीच्या मृत्यूनंतर अनेकांनी याला जातीयतेचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता, त्यासंदर्भात थरूर यांनी, “बहुसंख्येने मुस्लिम असणाऱ्या जिल्ह्यात अशा घटना घडल्यावर नक्कीच लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो.” असे म्हंटले आहे. त्याबाबतही यामध्ये कोणत्याच प्रकारचा जातीयवादी संबंध नाही असा खुलासा करण्यात आला आहे. फॉरेस्ट तसेच पोलीस विभागाने याबाबतीत तक्रार नोंदविली असून तपास सुरु आहे असे सांगण्यात आले आहे. जेव्हा ही घटना वनविभागाला समजली तेव्हा त्यांनी त्या हत्तीणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ ठरले, तसेच ही घटना २७ मे रोजी घडल्याचा खुलासा करण्यात आला आहे. या मानवीय कृत्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.