Bihar Politics : बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न, नितीशकुमार मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री

Bihar Politics nitishkumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bihar Politics । बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आरजेडी सोबतची आपली आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापण करणार आहेत. नितीशकुमार आणि भाजपशिवाय जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही सत्तेत सहभाग असणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून नितीशकुमार तब्बल ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही २ उपमुख्यमंत्री पाहायला मिळतील.

कोण असतील 2 उपमुख्यमंत्री – Bihar Politics

भाजपकडून सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा आणि डॉ. प्रेम कुमार, जेडीयूकडून विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमार, एचएएम (एचएएम) कडून जितन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित सिंह हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांनी नितीश कुमार राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करतानाचा फोटो ट्विट केला आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बिहारच्या नव्या NDA सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री असतील.

दरम्यान, आज सकाळीच नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या हाती सुपूर्द केला. तयामुळे बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) मोठी खळबळ उडाली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. महाआघाडीतील परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे . मी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांची मते आणि सूचना मला मिळत होत्या. त्या सर्वांचे म्हणणे ऐकून मी आज राजीनामा दिला असं त्यांनी म्हटलं .

खर्गेंचा नितीशकुमारवर हल्लाबोल

दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला आहे. नितीशकुमार हे आया राम, गया राम असे नेते आहेत. तेजस्वी यादव यांनी आमच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, नितीश कुमार यांच्याबाबत शंका आहे. तरीही आम्ही त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत