हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांच्यासमोर सत्ताधाऱ्यांनीच आक्रमक पावित्रा घेतला. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आहा विधिमंडळाच्या सभागृहात उमटले आहेत. मुद्दा उचलून धरत थेट हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केल्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता राऊतांच्या विधानाचे पडसाद विधीमंडळात उमटले आहेत.
संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी टीका करताना एक वादग्रस्त विधानही केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधीमंडळ अभागृहात उमटले. सभागृहाच्या कामकाजास सुरुवात होताच सुरुवातीला भाजप आमदार आशिष शेलार यांना राऊत यांनी केलेल्या विधानाची आठवण सभागृहास करून दिली.
संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही. हा महाराष्ट्र द्रोह आहे. महाराष्ट्राबाबत ही भावना असेल तर ठाकरे गटाच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या सभागृहात दाऊद आहे का? या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार यांच्या मागणीनंतर अतुल भातखळकर यांनी एक मागणी केली. ते म्हणाले की, राऊत यांनी जो विधिमंडळाचा अपमान केला त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी. त्यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. त्यांनी सरळ म्हटलं आहे. त्यांनी गुंड मंडळ म्हटलं. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपासूनची परंपरा आहे. तरीही तुम्ही चोरमंडळ म्हणता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. दरम्यान राऊतांवर हक्कभंग आणून तातडीने सुनावणी करावी व शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांच्याकडून कोल्हापूरचा दौरा केला जात आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना आज त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदेंची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो.