सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी
काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामाना सारखा आहे असा सनसनाटी आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. कराड- मसूर येथे आयोजित केलेल्या भाजपच्या किसान मोर्चाच्या कृषी विधेयक समर्थनार्थ मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा अडगळीत पडलेला पक्ष असून आता पुनरुज्जीवनासाठी धडपडत आहे यासाठी कृषी आयोगाला विरोध करण्याचा केविलवाणे प्रयत्न करीत आहे आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
फक्त शेतीच्या उत्पन्नाबाबत करार होईल हा करार शेतीच्या जमिनीच्या बाबतीत नाही. ही शेतजमीन गहाण ठेवता येणार नाही, खरेदी करता येणार नाही तसेच कोणतीही कंपनी त्यावर मालकी दाखवू शकणार नाही त्यामुळं काँग्रेसने जो भ्रम पसरवला आहे तो संपूर्ण निरास्त आहे आणि चुकीचा आहे असं अनिल बोंडे म्हणाले.
भांडवलदारांना आणि व्यापाऱ्यांना बाजूला सारून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिल्याने या व्यापाऱ्यांच्या धनशक्तीच्या जोरावर हा विरोध सुरु आहे. काँग्रेसची तर अवस्था अशी आहे की राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेच त्यांना अडगळीत ठेवलेल्या सामानासारख केलं आहे. त्यामुळे या विधेयकाच्या माध्यमातून स्वतःला पुनर्जीवित होता येईल का असा काँग्रेसचा कमजोर प्रयत्न आहे. असेही अनिल बोंडे यांनी म्हंटल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’