व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है; शेलारांची डायलॉगबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. मुंबईत आज भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.

आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेचं बजेट 45 हजार कोटींचं आहे. पण त्याच शिवसेनेनं काय केलं. देशातल्या सात राज्यांचं बजेट मुंबईपेक्षा कमी आहे. पण सुविधा काय दिल्यात? पण शिवसेनेनं फक्त भ्रष्टाचार दिला. मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली, कोस्टल रोडची मुहुर्तमेढ फडणवीसांनी रोवली, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने निधी दिला. मुंबईतील ५२ पूल नितीन गडकरींनी बांधले असं म्हणत मुंबईच्या विकासात भाजपचा मोठा वाटा असल्याचे शेलारांनी अधोरेखित केलं.

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनाचा महापौर बसवण्यात आला.. पण त्या वेळी भाजपचा महापौर होऊ शकला असता, पण मित्र पक्षासाठी आपण दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. पण आता मात्र आपलाच महापौर मुंबई महापालिकेवर बसेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.