‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; अधिवेशनात विरोधकांची घोषणाबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। सोमवारी विधानसभेच्या हिवाळी अधेवेशनाला सोमवार पासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी सावरकरांवरून तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  आज सकाळी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली आहेत.
यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’ अशा घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप आमदारांनी टीका केली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विरोधकांनी शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत देण्यात यावी, मदत मिळेपर्यंत कामकाज तहकूब करावे असा पवित्र घेतला आहे. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये धक्कबुक्की देखील झाली होती.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत झालीच पाहिजे, दिलेला शब्द पूर्ण करा, अशा मागण्याची घोषणाबाजी भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केली. तसेच यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.