हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही, असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावलाय.
महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार. महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधलाय.
महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार.
महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल.
बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही. pic.twitter.com/4RxdMUF3XQ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 18, 2021
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते-
भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल असा दावा पवारांनी केला होता.