हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांना यूपीए अध्यक्ष करण्याचा ठराव करण्यापेक्षा त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती असा टोला त्यांनी लगावला आहे.
याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती.😀
उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला. pic.twitter.com/lU7ZoJcU8A— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 30, 2022
संजय राऊतांचा पवारांना पाठिंबा-
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांना आपला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आज जर विरोधकांची एकजूट करायची असेल , बिगर भाजपशासित मुख्यमंत्री अन् भाजप विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर नक्कीच शरद पवार हे काम करू शकतात याबाबत सर्वांच्या मनात खात्री आहे. आम्ही तर ही भूमिका यापूर्वीच मांडली आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.