Monday, January 30, 2023

इतके निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणे हे राज्याचे दुर्दैव ; भातखळकरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात दोन दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आला असून अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी महापुराचा धोका असून नागरिकांच स्थलांतर करण्याच काम सुरू आहे. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे संताप व्यक्त केला जातोय. याचवरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय…”; ईद पार्टीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल झाले आहेत. इतके संवेदनाहीन, निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणे हे राज्याचे दुर्दैव आहे. तुमचा हा बेशरमापणा राज्यातील जनता कधीच विसरणार नाही असं भातखळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

काय आहे प्रकरण-

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.