हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून संकट वाढलं आहे. काही शहरात लॉकडाउन केलं असलं तरी कोरोना रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांची वाढती गर्दी रोखण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली.
दरम्यान, यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अतुल भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –
कोरोनाचा लढा संपलेला नाही. अशा वेळी कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’