कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण? हे राऊतांनी निश्चित करावे; भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात योग्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा चेहरा नसल्यास विजयी होण्याची शक्यता कमी असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे, की कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण? कधी ते उद्धवजींच्या तर कधी शरद पवारांच्या कोपराला गूळ लावतात.’ अशा असे ट्वीट करून अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान उभे करायचे असेल तर विरोधी पक्षांना एकजूट होऊन एका सक्षम नेत्याकडे या आघाडीचे नेतृत्व द्यायला हवे आणि हा नेता आताच्या घडीला शरद पवार यांच्याशिवाय दुसरा कुणीही असू शकत नाही. मोदींपुढे शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले.