Monday, January 30, 2023

खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर की सिल्व्हर ओक वर ? भाजपचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  यावरून आता भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर आहे की सिल्व्हर ओक वर असा सवाल करत भाजप नेते अतुल भातखलकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही. खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

- Advertisement -

अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम आहे. त्यामुळं खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच. शेवटी ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.