हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : या देशात पुलवामा घडवलं जात तर मग …बाकीचा विषयचं काय? असे सांगत भंडारा,भांडुप ,नाशिक नंतर विरार हॉस्पिटलला लागोपाठ आगी लागल्या नाही लावल्या गेल्या असणार असा मला दाट संशय आहे.तसेच राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी हा नक्कीच भाजप / आरएस e यांचा क्रूर खेळ असू शकतो, याची सीआयडी मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलताना केली आहे.
सोबतच देशातील विविध धार्मिक व जातीय दंगल घडवणारी भाजप प्रचंड अस्वस्थ होऊन सध्या पिसाळली आहे ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.आज माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर राजकीय हेतूने CBI मार्फत जनतेचा बुद्धिभेद करण्यासाठीच गुन्हा दाखल करून घरावर छापे टाकण्यात आले आहे.वास्तविक मुंबई हायकोर्टाने देशमुखांची चौकशी करून १५ दिवसात अहवाल द्यायची ऑर्डर केलेली होती त्याचं काय झालं ? वाझेचा मुख्य बॉस परमबीरसिंग मोकाट कसा ? कधी तरी सर्व प्रकरणांचा न्यायालय निकाल देईल पण तेव्हा वेळ गेलेली असेल.
कोव्हीड सारख्या महामारीच्या काळात पूर्वकल्पना असतांना विविध देशात ऑक्सिजन निर्यात केला , रेमडिसिव्हर निर्यात केले शिवाय कोव्हीड लशीची निर्यात करून देशातील जनतेला तिष्ठत ठेवले आहे.नमो सरकारने नेमकं काय साध्य केलं देशाला कळलं पाहिजे.स्वतंत्र भारताच्या इतिहासात यापूर्वी कोणतेच सरकार जनतेच्या जीवाशी खेळलेले नाही की सत्तेसाठी क्रूर डावपेच केले नाही की विरोधकांना कधी डावलले नाही. मात्र केंद्रातील सत्ताधारी भाजप लोकशाहीच्या पोटात हुकूमशाही राबवत आहे. अशी फक्त क्रूरकर्मा हिटलरचीच नीती होती.
देशातील व राज्यातील सुज्ञ जनतेने दिसून आंधळे व ऐकून बहिरे होऊ नये. मीडियाने किमान देशहितासाठी व लोकशाहीसाठी तरी धाडसाने निरपेक्ष आणि वास्तव पत्रकारीता करावी जेणेकरून जनतेचा मीडियावरील विश्वास उडू नये.असेही लवांडे यांनी म्हटले आहे.