आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | नव्याने येणारे आमचे सरकार हे मजबूत असणार आहे तेव्हा आम्ही सगळ्याचे हिशोब करणार आहे. तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्र लुटला आहे असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या टीकेला जहरी उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. ‘आम्ही कुणाला इनकम टॅक्स रेडची भीती दाखवली ते सांगा. तुम्हाला आपली माणसं आपल्याला जपता येत नाहीत आणि दुसऱ्याला दोष द्यायचा. भाजप कुणालाही ईडी किंवा इनकम टॅक्सची भीती दाखवत नाही,’ असे खडे बोल चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना सुनावले आहेत.

सहानभूती निर्माण करण्याचा शरद पवार प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांनी मागील ६० वर्ष देश लुटूला आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. धाक आणि धमकीच्या जोरावर भाजप आमदारांना आपल्या पक्षात सामील व्हायला लावत आहे असे विधान शरद पवार यांनी आज सकाळी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन केले होते.

म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Leave a Comment