मुंबई प्रतिनिधी | नितेश राणेंनी केलेला फिल्मी स्टंट त्यांच्या चांगलाच अंगलट येऊ लागला आहे. त्यांना त्या प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन करून या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा अशी याचना केली. त्याबद्दल स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.
माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!
चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. त्यावेळी यांनी मला नारायण राणे यांचा फोन आला होता असे म्हणले. तेव्हा नारायण राणे म्हणाले की दादा यातून माझ्या मुलाला वाचवा. त्यावर त्यांना मी म्हणालो कि आंदोलन करण्याची हि पध्द्त झाली का? आम्ही या प्रकरणी तुम्हाला कोणतीच मदत करू शकत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था बघून महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक झाली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा रोष नको म्हणून त्यांच्या कुटुंबाची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली त्यावेळी झालेल्या बातचिती मधून हि बाब उघड झाली आहे.
नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी
राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे
अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले
धनगर आरक्षणावर अमोल कोल्हे म्हणतात….
मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले