आता तुम्ही हिमालयात जाणार का?? पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कडून भाजपचा दणदणीत पराभव झाला.येवडच नव्हे तर पुणे आणि नागपूर या हक्काच्या मतदारसंघात देखील भाजप उमेदवाराना पराभवाचे तोंड पाहावं लागलं. पदवीधर निवडणुकांचा निकाल समोर येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका व्यक्तव्यावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी पदवीधर निवडणुकांमध्ये जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं होतं. भाजपच्या पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील खरंच हिमालयात जातील अशी टीका ठाकरे सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. यावर आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपचा पराभव झाला आता तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगलं. त्यांच्या या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नक्की काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील –

“मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’