हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला असून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरले आहे. “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1370628285411987459?s=19
अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला!,” असा आरोप केलेला आहे.
भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं ! pic.twitter.com/qSTxGa4Gsk
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 13, 2021
“भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं असा थेट सवाल चंद्रकांत पाटलांनी केला.
मराठा समाजाला आरक्षणासाठी मी आणि स्वतः देवेंद्रजी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहे. आतातरी ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावलं उचलावी व आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा