जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले आहे. Ncb अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून नोकरी मिळवली असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मालिकांच्या सुरात सूर मिसळत वानखेडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे. अहमदनगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात. तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवर कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

नवाब मलिक जे काही बोलत आहेत म्हणजे सरकार बोलत आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात पुरावे समोर आले तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच तोपर्यंत समीर वानखेडे यांना अधिकारी पदी राहण्याचा अधिकार नाही असेही राऊत म्हणाले.