ममता बॅनर्जी थेट बोलतात, तर पवार…..; फडणवीसांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चाना उधाण आले. यावेळी त्यांनी थेट युपीए वर हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत ममता बॅनर्जी यांच्यासह पवारांवर हल्लाबोल केला.

काँग्रेसला बाजूला ठेवून बिगर काँग्रेस विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत आणि पवार साहेबांची त्याला साथ आहे. त्यावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे की आमच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा अंतर्गत सामना सुरू आहे. त्यांचा सामना झाला की आमच्याशी कसं लढायचं ते ठरवतील”, असं फडणवीस म्हणाले.

ममता दीदी थेट बोलतात आणि पवार बिट विन द लाईन बोलतात. दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे. राज्यात काँग्रेसला घेतल्याशिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नाही. शिवसेनेने गुप्त भेट केली तरी काही फायदा होणार नाही. 2024 देखील केंद्र सरकार हे मोदींचे असेल. हे प्रयोग 2019 साली देखील झाले. पण, मोंदींना काहीही फरक पडला नाही असे फडणवीस यांनी म्हंटल.