हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी मारली असून भाजपला शह देण्यासाठी कुठे आघाडी तर कुठे स्वबळाचा नारा दिला आहे. यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका केली आहे. नावात राष्ट्रवादी असलं म्हणजे राष्ट्रीय पक्ष होत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. फडणवीस यांचा तोच विडिओ भाजपने ट्विट करत राष्ट्रवादीचे वाभाडे काढले आहेत.
नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.
नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही @NCPspeaks हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष.
– श्री @Dev_Fadnavis ji
राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! pic.twitter.com/lNUcA5sCIW— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 14, 2022
यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादी अंक शरद पवारांवर निशाणा साधत म्हंटल की, शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही अस फडणवीस म्हणाले.