हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फडणवीस म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. यातील पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, यामुळे यंदाचं अधिवेशन केवळ 4 दिवसाचच असणार आहे. आमची मागणी होती, अधिवेशन वाढविण्यात यावे. मात्र, राज्य सरकारने अधिवेशन वाढविण्यास नकार दिल्याचं फडणवीस म्हणाले.
आम्ही म्हटलं तीन दिवस ब्रेक घ्या आणि अधिवेशन घ्या. जानेवारीत आणखी चार-पाच दिवस अधिवेशन होऊ शकतं. पण या सरकारची ती मानसिकता अधिवेशन घ्यायची दिसत नाही. प्रश्नाला सामोरे जाण्याची तयारी दिसत नाही. परंतु, माझ्या आग्रहानंतर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.