देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

fadanvis pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. फडणवीस- पवार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी नुकतंच आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या असून त्यासाठी ६ जूनपर्यंतची अंतिम मूदत दिली आहे. संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील ओबीसी आरक्षणावरुन कोर्टानं दिलेल्या निर्णयावरुनही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार वर टीका केली होती. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.  दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात असताना दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.