हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे.त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.
सर्व नागरिकांना लस मोफत देणार, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केली आहे. लसीकरणाबाबत महाविकासआघाडी मध्ये एकवाक्यता असली पाहिजे. मात्र, आता महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य का केली जात आहेत असेही फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.