कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल; फडणवीसांचा शिवसेना आमदाराला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना गायकवाडांचा खरपूस समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छ असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा.”

फडणवीस यांनी यावेळी नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ याचा देखील समाचार घेतला. नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीनं कारवाई केल्यामुळे ते केंद्रावर पिसाळल्यासारखे आरोप करतात तर हसन मुश्रीफ काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत त्यांना महाराष्ट्रबाहेर कुणी ओळखत नाही. असा टोला फडणवीसांनी लगावला.

You might also like