हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र भाजपला उतरती कळा लागल्याचे दिसते. कारण भाजपमधील अनेक मोठे नेते, मंत्री हे भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करू लागले आहेत. गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि त्यांच्याकडून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या इतर पक्षातील नेत्याचे इनकमिंग सुरु आहे. अशात भाजप नेते विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्हाणे यांनी भाजपच्या कार्यक्रम, बैठकांना गैरहजेरी लावली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपला सोडल्यानंतर गव्हाणे यांनी भाजपमध्ये निष्ठवंतांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उद्या गुरुवारी प्रवेश करणार आहेत. त्याच्या प्रवेशाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिकांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.