हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चार्ज वरून सकाळी चर्चा रंगू लागल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील अशी जोरदार टीका पडळकरांनी केली.
खर तर गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबीय यांच्यातील वाद काही नवा नाही. यापूर्वी देखील पडळकरांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. आजही त्यांनी अजित पवारांचा समाचार घेत म्हंटल की, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील
याशिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गट क साठी 15 लाख रुपये आणि गट क साठी 8 लाख रुपयाचा रेट समोर येत असून जर परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा संतप्त सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.