हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. आता भ्रष्टाचाराच्या, शेतकरी आत्महत्येच्या आणि कोरोनाच्या मुद्यांवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “राज्यात गत वर्षात भ्रष्ट्राचार तब्बल 16 टक्यांनी वाढला. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. अशात राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा होता, राज्याची दशा करणारा नाही. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची अधोगती करून दाखवली, अशी टीका भाजपने केली आहे.
भाजपने आपल्या ट्विट अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, स्वतः, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात राज्याची झालेली वाताहत भरून निघणारी नाही. राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा होता, राज्याची दशा करणारा नाही. महाराष्ट्राची अधोगती करून दाखवली आहे.
स्वतः, वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या @OfficeofUT सरकारच्या काळात राज्याची झालेली वाताहत भरून निघणारी नाही.
राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा होता, राज्याची दशा करणारा नाही. महाराष्ट्राची अधोगती करून दाखवली! pic.twitter.com/uo4cJxOGHD— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 13, 2022
वास्तविक पाहता देशाच्या एकूण बेरोजगारांपैकी सर्वाधिक 22 टक्के बेरोजगार महाराष्ट्रात आहेत. राज्यात गत वर्षात तब्बल 16 टक्यांनी भ्रष्ट्राचार वाढला. सर्वाधिक भ्रष्ट हे गृहखाते आहे. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल तब्बल स्थानी आहे. 70 हून अधिक लाख कोविड रुग्ण असून राज्यात कोरोनामुळे आजवर 1 लाख 41 हजार लोकांनी प्राण गमावले आहे. देशातील एकूण रुग्ण संख्येपैकी तब्बल 34 टक्के रुग्ण व मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहेत, असे भाजपने ट्विटमध्ये म्हंटले आहे.