मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा; भाजपने केले ‘हे’ 6 प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर भाजपने मात्र निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी टीकास्त्र सोडलं.

नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा, ना विचार… किमान उत्तरे हवी होती, असं केशव उपाध्ये म्हणाले. त्यासोबत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार?

महिन्या भरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार?

राज्यांने महीना भरात लस विकत का घेतली नाही?

शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परिक्षा न घेणे का?

अर्थचक्र कधी फिरणार?

माझ गाव करोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार? अशा प्रश्नांचा भडिमार केशव उपाध्ये यांनी केला.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.