हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस पार पडला. या अधिवेशनात अमरावती येथील हिंसाचाऱ्याच्या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता या सरकारच्या काळात हिंसाचाराचे हे रॅकेट चालले आहे. या रॅकेटबाबत ज्या एसआयटीने अमरावतीच्या घटनेचे पुरावे राज्य सरकारला दिले त्याच एसआयटीवर कारवाई करण्यात आली, अशी धक्कादायक माहिती फडणवीस यांनी सभागृहात देत आरोप केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहात अमरावती घटनेबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा दंगली घडल्यावर माझ्या लक्षात आले तेव्हा मी पूर्ण पुरावे गोळा करून एसायटीमार्फत डँगळीचे रॅकेट घडवणाऱ्यांवर पुराव्यानिशी कारवाई केली. अमरावतीत जो हिंसाचार झाला ती घटना दु्र्दैवी आहे. 12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो मोर्चा चुकीच्या माहितीतून काढला गेला.
त्रिपुरामध्ये जे घडलंच नाही ते झाल्याचं दाखवून हा हिंसाचार घडवण्यात आला. जी घटना घडलीच नाही त्याबद्दल रझा कादमीच्या लोकांनी एका रात्रीत लोकांना भडकवले. त्याच्यावर का कारवाई राज्य सरकारने केली नाही. त्यांच्यावर हे सरकार कारवाई करणार का? असा सवाल यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच ते पुढे म्हणाले की, हिंसाचाऱ्याच्या काढण्यात आलेल्या मोर्चातून विशिष्ट धर्माच्या लोकांची दुकानं फोडण्यात आली.12 तारखेची घटना आणि 13 तारखेला घडलेली घटना ही देखील चुकीचीच होती. आम्ही दोन्ही घटनांचे समर्थन करत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.