हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांबद्दल तर बिल्कुल नाही. शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळं त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असावा, असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांबद्दल तर बिल्कुल नाही. काल आशिष शेलार यांच्या प्रेसचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळं त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते किंवा आशिष शेलार महिलांबद्दल कोणतेही गैरशब्द वापरणार नाहीत. आणि नागपूरमध्ये भाजपचे उमदेवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते मोठ्या फरकानं विजयी होतील असा आम्हाला विश्वास असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.