हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “राज्य सरकारने गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवली आहेत. आता कोर्टाच्या निर्णयामुळे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली आहे. टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार मधील नेत्यांनी गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम केले आहे. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने खरंच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले असते, इम्पेरीकल डेटा तयार केला असता, तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती. इम्पेरीकल डेटा तयार करण्यासाठी आम्ही राज्य सरकारला मदत करु.
सुनावणीत केंद्र सरकारने सांगितले की, केंद्राचा डेटा हा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा आहे. सुप्रीम कोर्टाला जो डेटा हवा तो राजकीय मागासलेपणाचा आहे. त्यामुळे केंद्राच्या डेटाचा उपयोग नाही. हा राजकीय मागासलेपणाचा ‘एम्पिरिकल डेटा’ राज्य सरकारनेच गोळा करायचा आहे.
LIVE | Media interaction in #Nagpur
(Deferred Live) https://t.co/pOpm98ehQ9— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2021
हा डेटा तयार करण्यासाठी वेळ पडल्यास त्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा करावा. मात्र, तीन महिन्यात हा डेटा तयार करुन मगच निवडणुका राज्य सरकारने घ्याव्यात. मात्र, ओबींसींना न्याय मिळवण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्तीची कमी असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.