भाजप नेते अनिल बोडेंनी दंगलीचे षडयंत्र रचले; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्यामागे भाजपचाच हात आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपचे सर्व शस्त्र जेव्हा संपतात तेव्हा भाजप दंगली घडवण्याचे शस्त्र बाहेर काढते. अमरावती येथे अशाच प्रयत्न केला गेला. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले. यासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात पैसे गेले. आज त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता अशा प्रकारचे हीं स्वरूपाचे राजकारण भाजपकडून केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही असेही नवाब मलिक यांनी म्हंटल.