मलिकांचं डोकं ठिकाणावर नाही, मलिकांसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. मलिक डोके ठिकाणावर नाही. मलिकांसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत आहेत. गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. मग त्यांनी केले आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी जे आरोप केले आहेत. त्यावरून त्यांचे डोके ठिकाणावर नाही असे दिसते. त्यांनी अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आता ते म्हणतायत कि आशिष शेलार हे रझा अकादमी यांच्यासोबत होते. त्याचे ते फोटो दाखवत आहेत. आमच्याकडेही फोटो आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीचे नेते हार घालतानाचे आता मुख्यमंत्र्यांसंदर्भात मालिकांची काय भूमिका आहे? ती त्यांनी मांडावी.

भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्या अटकेबद्दल दरेकर म्हणाले की, हिंदुत्वासाठी हिंदुत्ववाडी विचारधारेसाठी भाजपच्या एक काय शंभर लोकांना अटक केली तरी आम्ही त्या अटकेला घाबरत नाही. कारण आम्ही विचारधारेशी घट्ट आहोत. आम्ही सत्तेसाठी त्या ठिकाणी विचारधारा गुंडाळून ठेवणारे नेते नाही आहोत. आणि त्याच्यामुळे याठिकाणी त्या विचारधारेकरिता वाटेल ती किंमत मोजावी लागली, जेलमध्ये जावे लागले तरी विचारधारेपासून आम्ही बाजूला जाणार नाही, असे दरेकर म्हणाले.