हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदानापूर्वी भाजप नेत्यांकडून आपणच जिंकू असे दावे केले जात आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन्ही पैकी एक तरी संजय जाणार नक्की जाणार आहे, असे मोठे विधान भाजप आमदार अनिल बोंडे यांनी केले.
भाजप आमदार अनिल बोंडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोंडे म्हंटले, संजय राऊत जाणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “कोणता अश्वत्थामा गेला होता हे देखील धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार आहे. 5.30 वाजता कोणता ते कळेल.
संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपाचे तिन्ही उमेदवार 100 टक्के विजयी होणार. कारण देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बोंडे यांनी नेमक्या कोणत्या संजयवर निशाणा साधला आहे? हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे