सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष भाजपा व मनसे या मुद्यावरून आक्रमक झाली असून, सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांच्या रोखठोक सदराचा आधार घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा..आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नक्की काय लिहिलं होतं रोखठोक सदरात –

“औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!” असं संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात म्हटलेलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment