पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्या, अन्यथा; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दहीहंडीच्या मंडळाच्या पथकांसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना प्रमाण वाढत असून त्यात कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. “लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी. दि न दिल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी नाकारल्याने आक्रमक झालेले भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, “गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली, त्याच पद्धतीने दहीहंडी उत्सवाची परंपरा अखंड राखतील. कोरोना परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. उत्सवावर पूर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहील अशी भूमिका शासनाने घ्यावी.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपण पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाबाबत घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा. आणि राज्यातील गोविंदा पथकांना दहीहंडी साजरी करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करता येईल. जर आपण आम्ही केलेल्या मागणीचा विचार न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशाराही यावेळी आमदार शेलार यांनी दिला आहे.